मुख्य मार्गावरील शेतीच्या किमती वाढल्या; विक्रीची किंमत कमी!

20 Dec 2025 20:18:05
विजय माहूरे, 
सेलू,
main-road-agricultural-prices : शहराच्या सभोतल असणार्‍या गाव खेड्याच्या शेताच्या किमती भरमसाठ वाढल्या असल्या तरी विक्री कमी किमतीने होत असल्याने शासनाचा महसूल बुडत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेलू हे तालुयाचे ठिकाण आहे. पण, सेलुच्या हद्दीत ले आऊटसाठी कुठेही जागा नाही. ले आऊट मालक हे रेहकी, रमाना, धानोली या ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या शेती विकत घेऊन ले आऊट पाडत आहेत. पण, ज्या भावात शेती घेत आहे त्या भावाची विक्री होत नसल्याचे वास्तव आहे. शासकीय किमती नुसार विक्री होत असल्याने शासनाच्या महासुलावर गदा येत असल्याचे दिसून येत आहे.
 
 

K 
 
 
विकास चौक ते घोराड, यशवंत चौक ते सुकळी स्टेशन, सेलू ते रेहकी, सेलू ते वडगाव या रस्त्यावरील शेतीची मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होत आहे. येथील शेती महागड्या किमतीने जात आहे. पण, विक्री मात्र शासनाने ठरवून दिलेल्या किमती नुसार होत असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र, लेआऊट धारकांना ही जमीन मिळाल्यानंतर भूखंडाचे भाव गगनाला भिडले दिसतात. आपलं घर सुंदर घर हे स्वप्न पूर्ण करावयाचे असल्याचे फुटाचे भाव १ हजाराच्या वर जात आहे. पण, कृषक जमीन अकृषक होऊन लेआऊटमध्ये रुपांतर कशी होते हा संशोधनाचा विषय झाला असला तरी भूखंड पाडण्यास ग्रामपंचायत मंजुरी कशी देते यामागे अर्थकारण तर दडलं नाही ना अशी शंका निर्माण होत आहे. भूखंड धारकांना या बाबत सतर्क करण्यासाठी ग्राम पंचायत प्रशासानाने ग्राम पंचायतमध्ये सूचना लावणे अनिवार्य करावे अशी मागणी
जोर धरत आहे.
 
 
शासनाचे नियम पाहता रस्ते, नाल्या, विद्युत खांब यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने ले आऊटमधील भूखंडाचे भाव वाढतात असे एका लेआऊट मालकाने सांगितले. पण, कोणत्याही ले आऊटमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र विहीर व नळ योजनेसाठी पाण्याची टाकी बांधलेली दिसत नाही. त्यामुळे भूखंडधारकांना ग्रामपंचायतवर अवलंबून राहावे लागत आहे हे विशेष.
Powered By Sangraha 9.0