तभा वृत्तसेवा
राळेगाव,
janrao-giri : शहरासाठी अत्यावश्यक 48 कोटी रुपयांची (अमृत 2.0) अमृत पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली आहे. या संदर्भात सर्व शासकीय सोपस्कार पार पडले. या दहा-बारा दिवसांत राळेगाव शहरातील या महत्वाकांक्षी योजनेस अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आले. ही योजना कार्यान्वित होणार असल्याचे प्रतिपादन राळेगाव नपंतर्फे घेतलेल्या पत्रपरिषदेत करण्यात आले.
नागपूरला हिवाळी अधिवेशनात नपं राळेगावमधील पदाधिकाèयांनी हा महत्त्वाचा मुद्दा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना सांगितल्यावर त्वरित या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले, अशी माहिती शनिवारी पत्रपरिषदेत नपं अध्यक्ष रविंद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी यांनी दिली.
पत्रकारांनी विचाललेल्या या विषयाशिवाय इतर महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे उपाध्यक्ष जानराव गिरी यांनी दिली. ही महत्त्वाची योजना त्वरित मार्गी लावण्यासाठी नपंच्या वतीने दिड वर्षांपासून वेगळ्या पद्धतीने ही योजना अंतिम टप्प्यात आणल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी नपं अध्यक्ष रविंद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी, बांधकाम सभापती दिलीप दुदगीरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप ठूणे व इतर पदाधिकाèयांसह नगरसेवक, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.