दारव्हा तालुक्याला भरली हुडहुडी

20 Dec 2025 21:26:27
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
darwha-weather : जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला असून दिवसाही उबदार कपडे घालण्याची वेळ आली आहे. तापमानाचा पारा उतरला असून तालुक्यातील तापमान आणखी घटण्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.
 
 
K
 
 
उत्तरेकडून येणाèया थंड वाèयामुळे महाराष्ट्र व यवतमाळ जिल्हा तसेच तालुकाही गारठला. जिल्ह्यातील पारा 9 अंश सेल्सिअसपर्यंत उतरला असून त्याची झळ तालुक्यातही पोहचत आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, शेकोटीजवळील गप्पा करण्यासाठी कोणता तरी विषय लागत असतो आणि सध्या निवडणुकीसंबंधी विषय हा बहुतेकांचा आवडीचा निदान काही नाही तर चर्चेसाठी तरी आवडीचा असतो.
 
 
शेकोटी आणि राजकीय गप्पा या दोन्हीचा आनंद नागरिक थंडीतही रूचीने घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, थंडीचा कडाका एवढा वाढला आणि हवेतील गारवा वाढल्याने दिवसासुद्धा नागरिक उबदार कपड्यांना प्राधान्य देत आहे.
Powered By Sangraha 9.0