पुणे जिल्ह्यात अजितदादांचा दबदबा; 17 पैकी 10 नगराध्यक्ष विजयी

21 Dec 2025 14:26:33
पुणे,
Ajit Pawar's victory in Pune district पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल समोर आला असून राज्यभरातील मतमोजणीतून विजयी नगराध्यक्ष व नगरसेवकांची नावे हळूहळू स्पष्ट होत आहेत. पुणे जिल्हा हा राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात असल्यामुळे निकालाचे सर्वत्र लक्ष वेधले आहे. पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निकालात अजित पवार गटाचा दबदबा दिसून आला आहे. नगराध्यक्ष पदावर 17 पैकी 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिंकल्या आहेत.
 
 
 
ajit pawar pune
नगरपरिषदा व विजयी पक्षाचे वितरण पुढीलप्रमाणे आहे: लोणावळा: राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), तळेगाव: संतोष दाभाडे, भाजप, दौंड: दुर्गादेवी जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), चाकण: मनीषा गोरे, शिवसेना, शिरूर: ऐश्वर्या पाचरणे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), इंदापूर: भरत शाह, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), सासवड: आनंदी काकी जगताप, भाजप, जेजुरी: जयदीप बारभाई, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भोर: रामचंद्र आवारे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आळंदी: प्रशांत कुराडे, भाजप, जुन्नर: सुजाता काजळे, शिवसेना एकनाथ, राजगुरुनगर: मंगेश गुंडा, शिवसेना एकनाथ शिंदे.
 
 
नगरपंचायतीतही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दबदबा दिसून आला. वडगाव मावळमध्ये आंबोली ढोरे विजयी, मंचरमध्ये राजश्री गांजले विजयी, तर माळेगावमध्ये सुयोग सातपुते विजयी ठरले. या निकालातून पुण्यात अजित पवार गटाचा होमग्राऊंडवर जलवा सिद्ध झाला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी काही ठिकाणी विजय मिळाला असला तरी, शहरातील महत्त्वाच्या नगरपालिका व नगरपंचायतांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले आहे. या निकालामुळे पुण्यातील राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0