रेल्वेतलई जवळ वाघाचा मुक्तसंचार

21 Dec 2025 21:22:31
धारणी,
tiger-roaming-freely : धारणी मार्गेधुळघाट अकोट रोडवर एक धिप्पाड वाघ मुक्तपणे विचरण करताना अनेकांना दिसल्याने एकच खळबळ माजलेली आहे. पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाची लाट असली तरी या मार्गावर नेहमी प्रवास करणार्‍यांची घाबरगुंडी उडालेली आहे.
 
 
amt
 
 
 
१९ डिसेंबर रोजी मध्यप्रदेशातील लोक चारचाकी वाहनाने अकोटकडे जात असताना उजाडगाव असलेल्या तलई (रेल्वे) जवळ गवतात बसलेला वाघ दिसला. त्याचे फोटो पण काढले तर जवळून दर्शन सुद्धा केले. अकोट वन्यजीव विभागातील तलई गाव धारणी तालुक्यात होते. मात्र प्राण्यांच्या संरक्षणासाठी गावाचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. जवळचे सोमठाणा, बारुखेडा, केलपाणी गाव पण पुनर्ससित झाल्याने हे जंगल वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित स्वर्ग झालेले आहे. धुळघाट ते झिरीपर्यंतचा रस्ता पण प्रतिबंधित मार्ग आहे, हे विशेष. शुक्रवारी पट्टेदार वाघाचे दर्शन आरामाने झाल्याने वन्यजीवप्रेमी खुश आहेत. दुसरीकडे या मार्गावर प्रवास करणारे मात्र घाबरलेले आहेत. हे वानचे जंगल असून वन्यजीव विभागात आता फक्त कर्मचार्‍यांचे निवास आहेत.
Powered By Sangraha 9.0