गावात कुत्रा, मांजरी नाही तर बिबट्याला पाळतात?

21 Dec 2025 12:38:07
राजस्थान,
Beda village leopards, राज्यात ग्रांमीण भागांसह शहरांमध्ये बिबट्या दिसत आहेत. सर्वांना प्रश्न पडला आहे की अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात बिबटे कसे काय वाढलेत.राज्यभर सध्या बिबट्यांच्या हल्याची बातमी सर्रास ऐकायला मिळते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच ठाणे शहरात बिबट्याचा वावर सुरू असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या गुरांचा आणि काही वेळा माणसांचा जीवही गमावला गेला आहे. या घडामोडीमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
 

Beda village leopards, 
मात्र, राजस्थानमधील अरावली पर्वताच्या कुशीत वसलेलं ‘बेडा’ हे गाव या सर्व घटनांपासून वेगळं ठरलं आहे. या गावात बिबटे माणसांच्या वस्तीत, शेतात आणि मंदिरांजवळ मोकळेपणाने वावरतात, आणि या वावरामुळे गावकऱ्यांना कुठलाही धोका वाटत नाही. गावकऱ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या या बिबट्यांसोबत इथे शेकडो वर्षांचा नातं आहे.
स्थानिक रबारी Beda village leopards, समाज बिबट्यांना जमिनीचे रक्षक मानतो. बिबटे मंदिरांच्या गुहांजवळ दिसताच लोक त्यांचा आदर करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. या गावात गेल्या कित्येक दशकांपासून बिबट्यांच्या हल्यामुळे एखाद्या मानवी मृत्यूची नोंद नाही. शेतकऱ्यांचे गुर नुकसान झाले तरीही गावकऱ्यांनी संयम राखला आहे आणि बिबट्यांसोबत शांततेत जगण्याचा मार्ग अवलंबला आहे.बेडा गावात सुमारे ५० हून अधिक बिबटे घरांमध्ये, शेतात आणि मंदिरांमध्ये मोकळेपणाने वावरतात. गावकऱ्यांवर किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचा कुठलाही हल्ला होत नाही. रबारी समाजाने पिढ्यानपिढ्या या परंपरेला जपले असून, बिबटे आणि माणसं एकत्रित शांततेत कसे राहू शकतात हे या गावाने दाखवून दिलं आहे.या अनोख्या नात्यामुळे बेडा गाव हे बिबट्यांसाठी जगभरात वेगळं ओळखलं जातं. अरावलीच्या टेकड्यांमधील या गावाने प्राणी आणि मानव यांच्यातील शांत सहअस्तित्वाचा आदर्श तयार केला आहे.
Powered By Sangraha 9.0