अमरावती,
BJP has 6 mayors in Amravati अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगरपरिषद व दोन नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपाचे सहा उमेदवार तर काँग्रेसचे दोन, दोन्ही शिवसेना, प्रहार, वंचित यांचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाला आहे. अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजपाच्या रूपाली माथने, अंजनगाव सुर्जी नगर परिषदेमध्ये भाजपाचे अविनाश गायगोले, धरणी नगरपंचायत मध्ये भाजपाचे सुनील चौथमल, धामणगाव नगर परिषदेमध्ये भाजपाच्या अर्चना रोठे - अडसड, वरुड नगर परिषदेमध्ये भाजपाचे ईश्वर सलामे, शेंदुरजना घाट नगर परिषदेमध्ये भाजपाच्या सुवर्णा वरखडे विजय झाल्या आहे. दर्यापूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे, चिखलदरा नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे शेख अब्दुल, चांदुर रेल्वे नगरपरिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा, चांदूरबाजार नगरपरिषद मध्ये प्रहारच्या मनीषा नांगलिया, मोर्शी नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रतीक्षा गुल्हाने, नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत मध्ये शिवसेना उबाठाच्या प्राप्ती मारोडकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून विजयी झाले आहे.