नागपूर,
International Meditation Day पतंजली योग समिती, रघुजीनगरतर्फे जवाहर सोसायटीच्या सभागृहात सुरू योग वर्गात आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ योग शिक्षक नामदेव फटिंग यांनी सांगितले की ध्यान केल्यास एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते, रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते, काम करण्याची क्षमता वाढते, मानसिक ताण-तणाव आणि चिंता कमी होतात तसेच झोपेची गुणवत्ता सुधारते. ते म्हणाले की यासाठी नियमित ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमाला पद्माकर आगरकर, श्रीराम दुरगकर, मोरेश्वर मेघरे, पद्माकर बाविस्कर, प्रा. महादेव बोराडे, गजानन महाले, एड. आनंद भेंडारकर आणि गुलाब उमाठे यांच्यासह इतर उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सौजन्य: श्रीराम दुरगकर, संपर्क मित्र