नागपूर,
maheshwari-youth-organization : अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने २६ २८ डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय क्रीडा महोत्सव व बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभ २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोएंका फार्म्स, येथे होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सोलर इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय, प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित तीन दिवस क्रीडा महोत्सवात २७ राज्यांतील सुमारे १५००हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. यात पुरूष व महिला क्रिकेट, बुद्धिबळ, फुटबॉल, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम अशा विविध खेळांचा समावेश आहे. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.
या आयोजनात राष्ट्रीय अध्यक्ष शरद सोनी, राष्ट्रीय क्रीडा मंत्री लड्डा, राष्ट्रीय उपाध्यक्ष हिमांशू प्रशांत मोहोटा, सागर लोहिया, अमोल बजाज, महेश बजाज, विवेक सरडा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय सहभागी आहेत.