चाैकशीसाठी डीआयएसएचची चमू अवाडा कंपनीत

21 Dec 2025 14:31:26
नागपूर,
Avada company बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील फेज दाेन मधील साेलार सेल तयार करणाèया अवाडा कंपनीत शुक्रवारी चाचणी सुरू असताना पाण्याची टाकी फुटून असताना टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेची सखाेल चाैकशी करण्यासाठी औद्याेगिक सुरक्षा व आराेग्य संचालनालयाची चमू शनिवारी घटनास्थळी पाेहाेचली. यावेळी नागपूर ग्रामीणचे अपर पाेलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांचीही उपस्थिती हाेती. या चमूने दुर्घटनेतील टाकीच्या पत्र्याचे नमुनेही गाेळा केल्याची माहिती आहे.
 

Avada company  
ही घटना नेमकी कशी घडली, टाकी कशामुळे फुटली, ती उभारताना सुरक्षा मानकांचे पालन झाले का याची सखाेल पाहणी व चाैकशी औद्याेगिक सुरक्षा व आराेग्य संचालनालयाचे पथक करीत आहे. यासंदर्भात नागपूर ग्रामीणचे अपर पाेलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी तरुण भारतला दिलेल्या माहितीनुसार संचालनालयाच्या पथकासाेबत ाॅरेन्सिकची चमूही हाेती. या पथकाने तेथील पत्रे व इतरही साहित्याचे नमूने तपासासाठी गाेळा केले आहे. तसेच यासंदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेज मिळू शकेल का यासाठीही प्रयत्न करीत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. औद्याेगिक सुरक्षा व आराेग्य संचालनालयाच्या चमूने दिलेल्या अहवालानुसार पुढचा तपास केला जाणार आहे. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. हा अहवाल लवकरात लवकर द्यावा यासाठी संचालनालयाला आजच पत्र दिल्याचेही म्हस्के यांनी सांगितले.
 
 
जखमींवर मिडाजमध्ये उपचार तर मृतांचे पार्थिक गावी रवाना
 
 
नागपूर ग्रामीणचे अपर पाेलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन मृतांचे शुक्रवारी एम्स रुग्णालयात तर तिघांचे आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचे पार्थिक अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या गावी पाठविण्यात आले आहे. यातील बहुतेक जण हे बिहार राज्यातील हाेते. जखमींपैकी तिघांवर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर बाकी सहांवर खापरी येथील मिडाज रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0