हिंगणघाट,
municipal-council-election-results-hinganghat : सुरुवातीपासूनच एकतर्फी वाटतं असलेली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या डॉ. नयना उमेश तुळसकर यांनी शरद पवार गटाच्या शुभांगी डोंगरे यांचा १८ हजार ७५ मतांनी पराभव करून एकतर्फी विजयश्री मिळवली. तर ४० नगरसदस्यांपैकी २७ भाजपा व दोन रिपाई व एक भाजपा समर्थीत अपक्ष (आठवले) असे ३० उमेदवारांसह भाजपाने दणदणीत विजय प्राप्त केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष नयना तुळसकर यांची मेहनतीत आ. समीर कुणावार या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
या निवडणुकीत भाजपा २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५, शरद पवार गट २, रिपाई आठवले २, उबाठा २, अपक्ष २, असे पक्षीय बलाबल आहे. प्रभाग १ मधून विक्रांत गर्ग मुनी भगत (रिपाई) माया राजू निखाडे (राका), प्रभाग २ सारिका अनासाने (उबाठा), वामन मावळे (भाजपा), प्रभाग ३ अनिता मावले व कमलेश वाघमारे (भाजपा), प्रभाग ४ सूरज कुबडे (अपक्ष), मनिषा लोणकर (शरद पवार गट), प्रभाग ५ मंदा राऊत व राजू कामडी (भाजपा), प्रभाग ६ पल्लवी बाराहाते व रवींद्र रोहणकर (भाजपा), प्रभाग ७ भूषण पैसे (भाजपा) व ज्योती वरघणे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग ८ वैशाली काळे (रिपाई)- मनिष धानुलकर (भाजपा), प्रभाग ९ रोहित हांडे (भाजपा)- शीतल बोरकर (शरद पवार गट ), प्रभाग १० नरेश युवनाथे व सोनू कुबडे (भाजपा), प्रभाग ११ मध्ये दुर्गा चौधरी व धनंजय बकाणे (भाजपा), प्रभाग १२ वंदना मैंद (भाजपा) - विनोद झाडे (राकाँ), प्रभाग १३ शीतल मोहता व दिनेश वर्मा (भाजपा), प्रभाग १४ मध्ये संजय माडे (भाजपा), जया बसंतानी (भाजपा समर्थीत), प्रभाग १५ योगेंद्र वाघमारे (राकाँ) व जयश्री देवढे (उबाठा ), प्रभाग १६ सौरभ पांडे व रविला आखाडे ( भाजपा), प्रभाग १७ प्रतिभा पडोळे व अतुल नंदागवळी (भाजपा), प्रभाग १८ मंगला कुमरे व निलेश ठोंबरे ( भाजपा), प्रभाग १९ नितेश नवरखेडे (राकाँ), प्राची पाचखेडे (भाजपा ) तर प्रभाग २० मध्ये अश्विनी मानेकर व सोनू गवळी (भाजपा)तून विजयी झाले.
या निवडणुकीत पती पत्नीचा तीन जोड्या उभ्या होत्या. त्यापैकी दोन जोडप्यांना पराभव स्वीकारावा लागला तर भाजपचे लकी जोडपे वामन माळवे व सौं अनिता माळवे विजयी झाले. उबाठाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व प्रभागातून उभ्या असलेल्या निता धोबे यांचा दोन्ही ठिकाणी तर त्यांचे पती माजी नगरसेवक सतीश धोबे प्रभागातून पराभूत झाले. शरद पवार गटाच्या शुभांगी डोंगरे नगराध्यक्षपदासाठी मोठ्या फरकाने तर त्यांचे पती प्रभागातून पराभूत झाले. कमलेश उर्फ बंटी वाघमारे सर्वाधिक मताने विजयी झाले. प्रभाग ३ मधील भाजपाचे उमेदवार बंटी वाघमारे यांनी सर्वाधिक मते घेऊन शहरातून सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान पटकावला. त्यांनी २ हजार ९४ मते प्राप्त करून १६७९ मतांनी विजयश्री प्राप्त केली. प्रहारचे जिल्हाध्यक्ष सूरज कुबडे यांनी शहरातून दुसर्या क्रमांकची मते ( १५३३ ) घेऊन विजय प्राप्त केली.
रणजित कांबळे गटाचा धुव्वा
माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात लढलेल्या काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. लढविलेल्या सर्वच्या सर्व जागेवर त्यांच्या उमेदवारांच्या अनामत जप्त झाल्या. तर प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख व रुग्णमित्र म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेले गजू कुबडे यांना धकादायक पराभव पत्करावा लागला.