मुंबई,
Vijay Wadettiwar महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आज (दि. 21 डिसेंबर) पूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहे. 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीचा कार्यक्रम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार एकाच दिवशी पार पडत आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर आता राज्यभर निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया सुरु झाली असून सर्वच पक्ष त्यांच्या विजयाची अपेक्षा करत आहेत.
यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसच्या आत्मविश्वासाची भरारी व्यक्त केली. वडेट्टीवार म्हणाले, “निकाल थोड्या वेळात येणार आहे. मी म्हणणार नाही की काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहील, पण निकालानंतर तुम्ही चकित व्हाल. ग्रामीण भागातील जनता आश्चर्यचकित करणारे निकाल देईल. मेट्रो शहराविषयी आम्ही फार बोलू शकत नाही, मात्र राज्यात काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर पाहता येईल.”
त्यांनी पुढे सांगितले की,Vijay Wadettiwar “विदर्भातील सर्वाधिक नगरपरिषदा काँग्रेसच्या ताब्यात राहतील. महाराष्ट्रात प्रचंड पैशाचा पूर आला, सत्तेचा दुरुपयोग झाला, त्यामुळे भाजप निवडणूक आयोगाच्या सहकार्याने एक क्रमांकावर राहणार आहे. मात्र जनतेच्या सहकार्याने, कुठलेही बळ नसतानाही काँग्रेस स्वबळावर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. याचा अर्थ असा की, जनतेच्या मनात काँग्रेस आहे आणि राहील.”वडेट्टीवार यांनी राज्यातील भाजपच्या ताकदीचा देखील स्वीकार केला. ते म्हणाले, “राज्यात एक नंबरवर भाजपच राहील, पण हे निकाल आल्यानंतर स्पष्ट होईल. 246 नगरपरिषदा आहेत आणि 246 पैकी काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहील, याबाबत मी खात्री बाळगतो.”
शिवसेना आघाडीवर देखील टीका करत त्यांनी सांगितले की, “शिंदे शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर जाईल. सत्तेच्या विरोधात लढताना आमचे राज्यात फक्त 16 आमदार आहेत, तरीही या बळावर आम्ही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतो आहोत. याचा अर्थ असा की जनतेच्या मनातील अपेक्षा, महिला, बेरोजगार आणि तरुण वर्गाच्या भावनांचा उद्रेक दिसतो आणि सत्ताधारी यातून धडा घेतील.”विदर्भातील निकालांवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “विदर्भात काँग्रेसने चांगले कामगिरी करावी आणि किमान 30 ते 32 नगरपरिषदा काँग्रेसच्या ताब्यात राहतील. सत्ता सक्रिय असल्यामुळे तेच ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसतात, आम्ही मात्र जनतेच्या सहकार्याने हे निकाल मिळवू.”संपूर्ण राज्यभरच्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निकालांवर सत्तापक्ष आणि विरोधी पक्षांची नजर आहे. काँग्रेसला आपले अस्तित्व दाखवून देण्याची आणि ग्रामीण भागात आपली ताकद सिद्ध करण्याची संधी आज दिसणार आहे.