अनिल कांबळे
नागपूर,
fire-at-a-furniture-shop : लकडगंजमधील पाच ते सहा फर्निचरच्या दुकानाला शाॅर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत जवळपास 60 लाखांचे नुकसान झाले असून दुकानदार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. आग लागल्याच्या दुसèया दिवसापर्यंत पंचनामे न झाल्यामुळे दुकानदार अडचणीत सापडले आहेत.
लकडगंज भागातील पाच ते सहा लाकडी फर्निचर निर्मितीच्या दुकानांना शनिवारी आग लागली. रात्री आठच्या लागलेली आग ही ईलेक्ट्रीक मिटरमधून झालेल्या शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती तेथील दुकानदारांनी दिली. बालाजी फर्निचर या दुकानातून आगीचे डाेंब उसळताना दिसताच एकच खळबळ उडाली. नागरिकांनी धावाधाव करीत दुकानातील सागवान लाकूड काढण्याचा प्रयत्न केला तर काही दुकानदारांनी अन्य दुकानांना आग लागू नये म्हणून पाण्याची व्यवस्था केली.दरम्यान, महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला याची सूचना दिली. त्यानुसार सर्व अग्निशमन विभागातील जवानांनी दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वात तीन बंबासह घटनास्थळी धाव घेतली.
नागरिक आणि अग्निशमन दलाने आग लागलेल्या दुकानावर आणि आग पसरु नये म्हणून पाण्याचा मारा केला. आग विझविताना अन्य दुकानांवर पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत राजेश फर्निचर, जय माता दी फर्निचर, केएमसी फर्निचर, एनस्टार फर्निचर, फरहान वूड टर्निंग वर्क्स अशी पाच दुकाने आहेत. दुकानदार प्रशांत जांगळे, अभिमन्यू केचे, अनिल वांदे, वासूदे ठाकूर, राशीद अली आणि शाेएब अली यांच्या दुकानांचा समावेश आहे. एका दुकानामागे एका व्यक्तीने शेकटी पेटवली हाेती, तसेच उघड्यावर जेवन बनवले हाेते. त्या चुलीतील विस्तवामुळेसुद्धा आग लागल्याचा संशय काहींना आहे.
दुकानदारांनी दाखवली एकता
लकडगंजमधील पहिल्या क्रमांकाचे दुकान जळत असताना आजुबाजूच्या दुकानदारांनी लगेच धाव घेतली. सर्वच जणांनी मिळून जेवढे सागवान लाकुड वाचवता येईल तेवढे वाचविण्याचा प्रयत्न केला. सर्व दुकानदारांनी एकता दाखवल्यामुळे बराच मुद्देमाल वाचविता आला. अग्नीशमन दलालासुद्धा दुकानदारांनी मदत केल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले.
काेळसे बघून डाेळे डबडबतात
दुकानात लाखाे रुपयांचे सागवान भरलेले हाेते. त्यावरच वर्षभराचा व्यवसाय अवलंबून हाेता. आता दुकानात फक्त काेळसे बघायला मिळतात. काेळशांना बघून डाेळे डबडबतात. मुला-बाळांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे चित्र डाेळ्यासमाेर येते.
- अभिमन्यू केचे (दुकानदार)