रेल्वे स्थानकावरून दोन चोर अटकेत

21 Dec 2025 19:37:23
नागपूर, 
nagpur-railway-station : इतवारी रेल्वे स्थानकावरून दोन सराईत चोरांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. रेल्वेत प्रवाशांच्या गर्दीत चोरी करताना दोघेही आढळले. रवी निषाद (वय २०) आणि विष्णू लोधी (वय २८) दोन्ही रा. रामकुंड, रायपूर (छत्तीसगड) अशी अटक आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 

klok 
 
गाडी क्रमांक ५८८१५ इतवारी-तिरोडी पॅसेंजर फलाट क्रमांक ४ वर आली. दरम्यान जनरल डब्यात दोन व्यक्ती प्रवाशांच्या खिशात हात घालताना संशयास्पद अवस्थेत पथकाला आढळून आले. आरपीएफने दोघानाही ताब्यात घेऊन केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांच्याकडे प्रवासाचे तिकीट किंवा कोणतेही अधिकृत कागदपत्र आढळले नाही. कारवाईसाठी दोन्ही आरोपींना इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Powered By Sangraha 9.0