एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली

21 Dec 2025 19:41:58
नागपूर,
silver-price : तिसर्‍या आठवड्यात सोन्याच्या दरात संथ पण सातत्यपूर्ण वाढ पाहायला मिळाली असली, तरी चांदीने मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. अवघ्या ७ दिवसांत चांदीच्या दरात तब्बल १६ हजार रुपयांची ऐतिहासिक झेप पाहायला मिळाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत साप्ताहिक स्तरावर किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात २६० तर २२ कॅरेट सोन्यात २५० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३४,३३० रुपये (प्रति १० ग्रॅम), तर २२ कॅरेटसाठी १,२३,१५० रुपये लागत आहेत. मुंबई आणि पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १,३४,१८० रुपये असून २२ कॅरेटचा भाव १,२३,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि फेडरल रिझर्व्हचे संकेत यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत ही तेजी आल्याचे सांगितल्या जात आहे.
 
 

silver 
Powered By Sangraha 9.0