नागपूर,
Nagpur temperature : उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांमुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली आहे. नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गोंदियात सर्वात कमी ८.० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तर नागपुरातही ८.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.
उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे विदर्भाकडे वारे अधिक थंड झाले आहेत. येत्या ४८ तासांत तापमानात आणखी काही अंशांनी घट होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बहुतांश शहरांमध्ये किमान तापमान ८ ते १० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले जात आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक आहे. थंडीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी रात्री आणि पहाटेच्या वेळी स्वेटर आणि मफलरचा वापर करावा, असे प्रादेशिक हवामान विभागाने केले आहे. संपूर्ण विदर्भात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून, थंडीची लाट कायम आहे. पहाटे पडणार्या दाट धुक्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, दृश्यमानता कमी झाल्याने विमान व रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. याशिवायय महामार्गावरील वाहनचालकांना कसरत लागत आहे. थंडीच्या लाटेमुळे चौकाचौकात शेकोट्या पेटवून ऊब मिळवताना दिसत आहेत. सकाळी व्यायामासाठी घराबाहेर पडणार्यांच्या संख्येत घट झाली आहे. उबदार कपड्यांशिवाय बाहेर पडणे कठीण झाले असून थंडीमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.