पवनीत गड,आला पण सिंह गेला...

21 Dec 2025 18:57:13
पवनी,
Pawni Municipal Election अत्यंत अटीतटीची आणि चूरशीच्या ठरलेल्या पवनी नगर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुक लढविणाऱ्या डॉ. विजया नंदुरकर यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या भावना भाजीपाले यांचा पराभव करीत मोठा धक्का दिला. भाजपा णे नगरध्यक्ष पद गमावले असले तरी 20 पैकी 13 नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे गड आला, पण सिंह गेला अशी स्थिती झाली.
 

Pawni Municipal Election, NCP victory 
पवनी नगर परिषदेच्या 10 प्रभागातून वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडीसाठी मतदान झाले होते. भाजपच्या भावना भाजीपाले, राष्ट्रवादीच्या डॉक्टर विजया नंदुरकर, काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांकडे होते. विजया नंदुरकर या भाजपच्या उमेदवारीच्या दावेदारीत होत्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढाविली. सुरुवातीपासूनच ही निवडणूक अत्यंत तुळशीची होणार, असा दावा केला जात होता. आजच्या आलेल्या निकालाने ते सिद्ध झाले. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सुरुवातीच्या फेरीपासूनच उत्सुकता होती. अखेर 5 व्या फेरी अंती डॉ. नंदुरकर यांना 577 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. वीस प्रभागांमध्ये भाजपचे 13, शिवसेनेचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि अपक्ष एक असे नगरसेवक निवडून आले आहेत.
भाजपाने सर्वाधिक Pawni Municipal Election  नगरसेवक निवडून आणले असले तरी नगराध्यक्ष पद गमावल्याने गड आला पण सिंह गेला अशी अवस्था त्यांची झाली. भाजपासाठी हा मोठा धक्का असून विजयी उमेदवाराला तिकीट नाकारल्याने हे चित्र पाहण्याची वेळ आल्याची चर्चा आहे.
Powered By Sangraha 9.0