पीएम मोदींवरील बायोपिक ‘मां वंदे’च्या चित्रीकरणाला सुरुवात

21 Dec 2025 11:23:43
नवी दिल्ली,
PM Modi biopic Maa Vande film पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या मलयालम बायोपिक ‘मां वंदे’च्या चित्रीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. या चित्रपटात मलयालम सिनेसृष्टीतील सुपरस्टार उन्नी मुकुंदन पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार आहेत. चित्रपट समीक्षक आणि ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रीकरण सुरू झाल्याची माहिती दिली. सेटवर प्रथम पारंपरिक पूजा पार पडली, त्यानंतर शूटिंगला प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगाचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये उन्नी मुकुंदनसह चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि तंत्रज्ञ दिसत आहेत.
 

PM Modi biopic Maa Vande film 
‘मां वंदे’च्या घोषणेनंतरपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू झाल्याने या प्रकल्पाने वेग घेतला आहे. उन्नी मुकुंदन अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रांती कुमार करत असून वीर रेड्डी एम. हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. या बायोपिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्यांच्या राजकीय प्रवासावरही प्रकाश टाकण्यात येणार आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी निर्मात्यांनी हा चित्रपट केवळ मलयालमच नव्हे तर अनेक भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजीतही प्रदर्शित करण्याची योजना आखल्याचे समजते. त्यामुळे हा चित्रपट देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही पंतप्रधान PM Modi biopic, Maa Vande film मोदी यांच्या जीवनावर चित्रपट तयार झाले आहेत. 2019 साली दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी ‘नरेंद्र मोदी’ या शीर्षकाचा हिंदी चित्रपट बनवला होता. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी पंतप्रधान मोदींची भूमिका साकारली होती. आता हिंदीनंतर दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतूनही त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत असल्याने या विषयाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
दरम्यान, उन्नी मुकुंदन हे मलयालम सिनेमातील आघाडीचे नाव मानले जातात. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मार्को’ या चित्रपटामुळे ते विशेष चर्चेत होते. हनीफ अडेनी दिग्दर्शित या चित्रपटात उन्नी मुकुंदन अॅक्शन अवतारात दिसले होते आणि प्रेक्षकांनी त्यांच्या भूमिकेला मोठी पसंती दिली होती. ‘मार्को’ हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरला असून सध्या तो ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. आता ‘मां वंदे’मधील त्यांच्या भूमिकेकडे सिनेप्रेमी उत्सुकतेने पाहत आहेत.
Powered By Sangraha 9.0