बुलढाणा,
Pooja Gaikwad mayor of Buldhana अंत्यत चुरशीच्या नगर पालिका नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवकांच्या निवडणूकीचा निकाल दि. २१ डिसेंबर रोजी बुलढाणा नपा सभागृहात मतमोजणीनंतर दुपारी १ वाजता घोषित करण्यात आला. नगराध्यक्षपदी शिवसेना (शिंदे) पुजा संजय गायकवाड यांना १८५२५ मते मिळाली तर काँग्रेसच्या लक्ष्मी दत्ता काकस यांना १३७४५ मते मिळाली. तसेच भाजपच्या अर्पिता विजयराज शिंदे यांना ४१४९ मते मिळाली. पूजा गायकवाड यांचा ४७८० मतांनी विजय झाला.

निकाल घोषित होताच ढोलताशे डिजे, गुलाल पक्षाचे झेंडे विजयी रथावर फटाक्याच्या आतिषबाजीत जंगी मिरवणूक बाजार लाईल, कारंजा चौक, स्टेट बँक चौक, संगम चौक मार्गे काढण्यात आली. या मिरवणूकीत रथावर नगराध्यक्ष पूजा गायकवाड, आ. संजय गायकवाड, विजय अंभोरे निवडूण आलेले नगरसेवक, नगरसेविका युवा सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मृत्यूंजय गायकवाड सहभागी झाले होते.ठिकठिकाणी नागरिकांनी मिरवणूकीचे स्वयंस्फूर्तीने स्वागत केले. या निवडणूकीत शिवसेना २२ नगरसेवक निवडूण आलेले बहूमताला आवश्यक असलेल्या संख्या बळापेक्षा ६ नगरसेवक जास्त निवडूण आल्याने दणदणीत विजय उत्सव साजरा करण्यात आला. भाजपला दोन काँग्रेस दोन, राष्ट्रवादी शपा दोन, अपक्ष दोन, नगरसेवकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांना राजकीय संघटनात्मक चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.