सोलापुरात निकालाआधीच आत्मविश्वास...झळकले पोस्टर

21 Dec 2025 10:47:56
सोलापूर
Posters appeared in Solapur सोलापुरातील अक्कलकोटमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला निकालाआधीच आत्मविश्वास दिसत आहे. मतमोजणी सुरु होण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु करून फटाके उडवले आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांच्या विजयाचे अभिनंदनाचे बॅनर शहरभर झळकले आहेत.
 

poster  
अक्कलकोटमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत आहे. भाजपकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी, काँग्रेसकडून अशपाक बळोरगी आणि शिवसेना (शिंदे गट) कडून रईस टिनवाला उमेदवार आहेत. भाजप कार्यकर्त्यांमध्ये इतका आत्मविश्वास आहे की मतमोजणी सुरु होण्याआधीच मिलन कल्याणशेट्टी यांचे नगराध्यक्ष म्हणून अभिनंदनाचे बॅनर शहरभर लावण्यात आले आहेत, ज्यामुळे भाजपाच्या विजयाची शक्यता अधोरेखित होते.
Powered By Sangraha 9.0