पुलगाव,
pulgaon-municipal-council : पुलगाव नगरपालिकेच्या निकालात काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कविता ब्राह्मणकर यांनी भाजपाच्या ममता बडगे यांचा १७१५ मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणली. जनतेतून थेट झालेल्या नगराध्यक्षपदाकरिता कविता ब्राह्मणकर यांना ७६१० तर ममता बडगे यांना ५८९५ मतं मिळाली.

दहा नगरसेवक जिंकत काँग्रेस प्रथम तर आठ नगरसेवक भाजपा दुसर्या क्रमांकावर आहे. नगरपालिकेच्या सदस्य पदाकरता झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने १० जागा मिळवल्या, ८ जागांवर भाजपा तर अपक्ष ३ नगरसेवक निवडून आले. प्रभाग १ मधून प्रतिभा वर्मै व दुर्गेश यादव, प्रभाग २ मधून आकाश कागडे व विद्या वलीवकर, प्रभाग ३ मधून प्राजता हुमणे व दीपक आहुजा, प्रभाग ४ मधून अर्चना येसनकर व स्वप्निल रामटेके, प्रभाग ५ मधून संदीप बोरकुटे व श्रीमती राज नागपाल, प्रभाग ६ मधून अपूर्वा दांडेकर व प्रवीण पनिया, प्रभाग ७ मधून शैला राऊत व सतीश जयसिंगपूरे, प्रभाग ८ मधून करुणा राऊत व अमरदीप देशमुख, प्रभाग ९ शांतिदेव खैरकार व आली अल्फिया ताहेर, प्रभाग १० अ मधून सुहास नागदिवे व विजय जगनाडे तर क मधून आफ्रिन नजीम निवडून आले. नगराध्यक्ष तसेच सदस्यांनी जल्लोष करीत गुलालाची उधळत आतषबाजीची करून आनंद व्यत केला.
निकाल ऐकण्यास आलेल्याचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू
पुलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी येथील घुबडटोली भागात राहणारे मनोहर भेंडारकर नगर परिषदेसमोर उभे होते. अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. उपस्थितांनी त्यांना दवाखान्यात नेले. परंतु डॉटरांनी त्यांना मृत घोषित केले.