केमिकल लोचा; अटॅच ६ पोलिसांपैकी ४ कमबॅक

21 Dec 2025 20:37:11
तभा विशेष
वर्धा, 
wardha-news : नागपुरात हिवाळी अधिवेेशन सुरू असताना नागपूर येथील डिआयआरच्या पथकाने वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा.) येथे मादक पदार्थ तयार करणार्‍या कारखान्यावर छापा टाकून १९२ कोटी रुपयांचे मादक द्रव्य जप्त केले होते. या प्रकरणी मुखिया अग्रवाल सह ३ जणांना ताब्यात केले होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी कारंजा येथील ६ पोलिस शिपायांना वर्धा मुख्यालयत अटॅच केले होते. आज त्यापैकी ४ पोलिस शिपायांना कारंजा परिसरात नियुक्ती देण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली.
 

police 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा येथे अग्रवाल नामक युवकाने अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन सीसी टिव्ही दुरुस्तीच्या नावाखाली मेफेड्रान हे मादक पदार्थ तयार करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर डिआयआरच्या पथकाने कारंजा (घा.) येथे मादक पदार्थ तयार करणार्‍या कारखान्यावर छापा टाकून १९२ कोटी रुपयांचे मादक द्रव्य जप्त केले होते. या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. तर आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कारंजा (घा.) पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस शिपाई किशोर कापडे, निखिल वाने, अतुल गोटेफोडे, रितेश चौधरी हे चार कर्मचारी आज २१ रोजी कारंजा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. एमडी ड्रग्स प्रकरणात ६ जण वर्धा मुख्यालयात अटॅच झाले होते. ते पुन्हा येथे कार्यरत दिसुन आल्याने आश्चर्य व्यत करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0