नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे २१ रेल्वेगाड्या रद्द

21 Dec 2025 19:20:34
नागपूर, 
trains-cancelled : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागांतर्गत डोंगरगड भागात अप व लूप लाइनचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे काम होईल. या कामामुळे नागपूर इतवारी रेल्वे स्टेशन मार्गे धावणार्‍या अनेक मेमू व प्रवासी गाड्यांचे संचालन २६ ते २९ डिसेंबर दरम्यान प्रभावित होणार आहे. त्यामुळे तब्बल २१ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत काही गाड्यांच्या मार्गात व समाप्तीत बदल करण्यात येणार आहे.
 
 

ngp 
 
 
 
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, नागपूर इतवारी मार्गे धावणार्‍या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ६८७४३ गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू, ६८७४४ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-गोंदिया मेमू, ५८२०५ रायपूर-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी पॅसेंजर या गाड्या २७ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच २८ डिसेंबर क्रमांक ६८७१४ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-बालाघाट मेमू, ६८७१५ बालाघाट-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू, ६८७१६ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-गोंदिया मेमू, ५८२०६ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-रायपूर पॅसेंजर आणि ६८७१३ गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू रद्द करण्यात आली आहे. या नागपूरमार्गे धावणार्‍या गाड्यांसह तब्बल २१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर रायपूर-डोंगरगड ही गाडी दुर्ग येथे समाप्त केली जाईल. दुर्ग-डोंगरगड दरम्यान सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच ६८७०६ डोंगरगड-बिलासपूर मेमू/पॅसेंजर ही गाडी दुर्ग येथून सुरू होईल. डोंगरगड-दुर्ग दरम्यान या गाडीची सेवा रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.
Powered By Sangraha 9.0