विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा सामंजस्य करार

21 Dec 2025 13:10:49
नागपूर,
Vidarbha Institute of Technology विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (वि.आय.टी.), नागपूर आणि ॲम्पलमाइंड प्रा. लि., नागपूर यांच्यात विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार प्रशिक्षण व नियोजन अधिकारी डॉ. सौरभ व्ही. लवाटे आणि ॲम्पलमाइंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनी सतीश माते यांच्या हस्ते, प्राचार्य डॉ. एस. बी. देशपांडे व उपप्राचार्य डॉ. निलेश बोढणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 
manoj
 
 
 
या करारा अंतर्गत तांत्रिक प्रशिक्षण, कार्यशाळा, इंटर्नशिप, लाईव्ह प्रोजेक्ट्स व प्लेसमेंट संधी उपलब्ध होणार असून कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग व डेटा सायन्स या क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे.Vidarbha Institute of Technology व्ही.आय.टी.चे अध्यक्ष जुगल महेश्वरी व सचिव डॉ. पूजा महेश्वरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सौजन्य : मनोज वैराळकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0