मानोरा,
Belora road construction delay पंचायत समिती अंतर्गत येणार्या विठोली गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बेलोरा येथील अंदाजे २१ लक्ष रुपयाचे काम अर्धवट असल्याने रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? याबाबतच्या चर्चेला ग्रामस्थांमध्ये उधाण आले आहे. पंचायत समिती प्रशासनाने सदरील अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी जनतेमधून होत आहे.
मानोरा पंचायत समिती अंतर्गत रस्ता काम मंजूर होऊन ग्राम पंचायतचे कामाला सुरुवात केली होती. ग्राम पंचायत मार्फत गट ग्राम पंचायत विठोली अंतर्गत येणार्या बेलोरा येथे दोन महिन्यापुर्वी गाजावाजा करून रस्ता अंदाजे २१ लक्ष रुपये विकास कामाचे भूमिपूजनही थाटामाटात लोकप्रतिनिधी यांनी केले. रस्ता कामाला सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु रस्त्याचे काम अर्धवट करून कंत्राटदारांनी बंद पाडले आहे. रस्त्याचे काम अर्धवट असल्याने काम कधी पुर्ण होणार? की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुर्वी होणार नाही, अश्या चर्चेला ग्रामस्थांमध्ये उधाण आले आहे.
छायाचित्र - पुर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला रस्ता