भंडारा
Bhandaara municipal election जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेत एक धक्कादायक प्रकार काल समोर आला असून मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. भंडारा नगरपालिकेत प्रभाग क्रमांक ३ मध्ये नोटांसह एकूण सहा उमेदवार रिंगणात असतानाही प्रत्यक्षात केवळ चार उमेदवारांचीच मते मशीनवर प्रदर्शित होत असल्याचे निदर्शनास आले होते. या तांत्रिक तफावतीमुळे एका महिला उमेदवाराचे नाव आणि नोटा पर्याय गायब झाले होते. यावेळी ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा आरोप मतमोजणी मोजणीच्या ठिकाणी करण्यात आला होता. दरम्यान कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित ७ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज काढले.
भंडारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल काल जाहीर झाला. सकाळी साडेनऊ वाजता मत मोजणीला सुरुवात झाली. प्रभाग १ आणि २ ची मतमोजणी शांततेत पार पडली. मात्र त्यानंतर मतमोजणी सुरू असताना प्रभाग क्रमांक ३ मधील दोन उमेदवारांची तसेच नोटाची मतेच दिसत नसल्याने काही उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला. यावेळी बॅलेट युनिट आणण्याची विनंती करण्यात आली. यातही सहापैकी केवळ चारच उमेदवारांची नावे होती. त्यामुळे बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी चरण वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेतून केली.
प्रभाग क्रमांक ३ अ सदस्य पदाकरिता मतमोजणी करणे करिता मार्गदर्शन मिळणेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद भंडारा यांनी या कार्यालयास विनंती केलेली होती.
आज या प्रकरणात Bhandaara municipal election कर्तव्यात कसूर आणि कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रभाग क्र. ३ अ मधील मतदान केंद्र क्रमांक १ मधील मतमोजणी प्रक्रियेदरम्यान गंभीर तांत्रिक चूक निदर्शनास आली आहे. सदस्य ३'अ' पदासाठी एकूण ५ उमेदवार व १ नोटा असे ६ पर्याय असणे आवश्यक असताना, मतदान यंत्र तयार करताना उमेदवार क्र. ५ व ६ ची नावे झाकली गेल्यामुळे प्रत्यक्ष मतदान केवळ ४ उमेदवारांसाठीच उपलब्ध करून देण्यात आले. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान यंत्र तयार करणारे तसेच मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहचविणारे अधिकारी/कर्मचारी यांनी निवडणूक साहित्याची जुळवाजुळव आणि तपासणी करताना शासकीय कर्तव्यात जाणीवपूर्वक निष्काळजीपणे कसूर केल्याचे सिद्ध होत असल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (१) (अ) नुसार निलंबनाची ही कारवाई केली आहे.
उपसा सिंचन उपविभाग Bhandaara municipal election टेकेपार उपविभागीय अधिकारी मोहम्मद इसरार, तलाठी चांदोरी ए.एन. मळघने, लिपिक टंकलेखक, नगर परिषद भंडारा पियुष शक्करवार, जे. एम. पटेल, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भंडारा येथील प्राध्यापक (केंद्राध्यक्ष) के. एच. लांजेवार, विकास माध्यामिक शाळा आणि जुनिअर कॉलेज खरबी नाकाचे शिक्षक जी. एस. नागदेवे, सी.ई.ए. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना एम.आर.आर.डी.ए. भंडारा महेश हेमराज दुर्गाडे, नूतन कन्या शाळा शिक्षिका लीनादेवी चीचमलकर या सात जणांना निलंबित करण्यात आले आहे.
वड्याचे तेल वांग्यावर: बोरसे
करण्यात आलेली कारवाई वड्याचे तेल वांग्यावर अशी आहे. कारण जी जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे, त्यासाठी कर्मचाऱ्यांना दोषी धरून निलंबन करण्याचे काम म्हणजे अन्याय असल्याची प्रतिक्रिया न्यू गर्ल्स शिक्षण संस्थेचे सचिव शेखर बोरसे यांनी दिली.