ढाणकीत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

22 Dec 2025 18:48:52
डॉ. दिनेश जयस्वाल
ढाणकी,
Dhanaki municipal election, नगरपंचायतचे मतदान 2 डिसेंबर रोजी पार पडले. त्यात एकूण 13 हजार 708 मतदारांपैकी 10 हजार 637 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे ढाणकी नगरपंचायत यवतमाळ जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीत (77.60) अव्वल ठरली होती. मतदारांचा कल पाहता नगर पंचायतमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळेल, असे भाकीत दैनिक तरुण भारतने केले होते.
 
 

Dhanaki municipal election, mixed voter response
हे भाकीत खरे ठरले असूल नपंमध्ये पक्षीय बलाबल पाहता नवख्या चेहèयाला पसंती देत शिवसेना (उबाठा)च्या अर्चना वासमवार यांना ढाणकीकरांनी विजयी केले. तर भाजपा 2649 मतांनी दुसèया स्थानावर, काँग्रेस 2612 मतांनी तिसèया स्थानावर तर शिवसेना शिंदे 1883 मतांनी 4 थ्या स्थानावर राहिले.
 
नगरसेवकांमध्ये भाजपाचे 7 नगरसेवक, शिवसेना 3 नगरसेवक, एमआयएमचे 3 नगरसेवक, काँग्रेसचे 2 नगरसेवक व अपक्ष 2 नगरसेवक असा संमिश्र कौल ढाणकीकरांनी दिला.
 
 
17 प्रभागांमध्ये 88 उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले असून नपं अध्यक्षपदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गेल्या 18 दिवसांपासून नेमका कौल कुणाला, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर सर्व कोडे रविवारी उलगडले.
Powered By Sangraha 9.0