तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Green World Co-Pride Award, जागतिक सहकार वर्ष 2025 निमित्त ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित सहकार संमेलनात गोदावरी अर्बन नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.हा प्रतिष्ठित पुरस्कार महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर तसेच कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी गोदावरी अर्बनचे सचिव अॅड. रवींद्र रगटे, उपसरव्यवस्थापक रवी इंगळे, विजय शिरमेवार, वरिष्ठ मार्केटिंग अधिकारी महेश केंद्रे तसेच पुणे शाखेचे व्यवस्थापक अंकुश बिबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी गोदावरी अर्बनच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करत, संस्थेने सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार काढले.
सहकार क्षेत्रात पारदर्शकता, आधुनिक व्यवस्थापन प्रणाली, सभासदाभिमुख सेवा तसेच सातत्यपूर्ण प्रगती या माध्यमातून गोदावरी अर्बनने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांनी गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, समस्त संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व सभासद व ठेवीदार यांचे अभिनंदन केले. हे यश संघभावना, प्रामाणिक कार्यपद्धती आणि सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.