गुरुजी आपली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहचवितात : मुख्यमंत्री

22 Dec 2025 20:04:14
गोंदिया, 
 
gondia-ruteshwar-cm कलयुगात पाप वाढले आहे आणि पापांमुळे आपली आवाज, प्रार्थना ईश्वरांपर्यंत पोहचत नाही. यावर मी असे माणतो की, कलयुगात आपली प्रार्थना श्री गुरूजी व श्री हनुमानजी ईश्वरापर्यंत पोहचवितात, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. gondia-ruteshwar-cm येथील नमाद महाविद्यालयाच्या प्रांगणात खा. प्रफुल्ल पटेल व त्यांच्या कुटूंबीयांच्या वतीने वृंदावन येथील संत ऋतेश्वर महाराज यांचे हनुमंत कथेचे आयोजनाप्रसंगी सोमवार, २२ डिसेंबर रोजी श्री ऋतेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी आले असता फडणवीस बोलत होते.
 
 
 
 
gondia-ruteshwar-cm
ऋतेश्वर महाराजांचे दर्शन घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित इतर 
 
gondia-ruteshwar-cm या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. परिणय फुके, जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आ. विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, आ. राजू कारेमोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष सीता रहांगडालेंसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् | वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥’ हे स्तोत्र म्हणून हनुमानजीची स्तुती केली व खा. पटेल दाम्पत्याचे आभार मानले. gondia-ruteshwar-cm तत्पूर्वी फडणवीस यांनी ऋतेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन हनुमानजींच्या छायाचित्राचे पूजन केले. दरम्यान, खा. प्रफुल्ल पटेल यांनी स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचे स्वागत केले.
Powered By Sangraha 9.0