himalayan monal नेपाळचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता पावलेला आणि हिमालयात आढळणारा मोनाल नावाचा देखणा, तितर पक्ष्यांमध्ये समावेश आहे. साधारण कोंबडीच्या आकाराएवढा मोनाल पक्षी हिमालयाच्या २१०० ते ४५०० मीटर उंचीवरील जंगलात आणि झुडुपांमध्ये वावरतो. दोन-अडीच किलो वजनाच्या मोनालची लांबी ७० सेंमी म्हणजे असते. विविध रंगांत असल्याने त्याचे सौंदर्य खुलून दिसते. नर मोनाल तर अधिक आकर्षक दिसतो. नेपाळ आणि उत्तराखंडात याचे सांस्कृतिक महत्त्व आहे.
आपल्याकडील तितर पक्षी म्हणजे हिमालयीन मोनाल आहे. फॅसियानिडे वंशातील मोनालला 'डॅम्फे' असेही म्हणतात. नर मोनालच्या संपूर्ण शरीरावर बहुरंगी पिसारा असतो तर मादीचा रंग इतर तितर पक्ष्यांप्रमाणेच पण कमी असतो. लांबुळका असलेला नर मोनालच्या पाठीवर आणि मानेवर तांब्यासारखे पंख ठळकपणे दिसत असून उडताना सर्वात जास्त दिसणारा पांढरा ठिपकाही त्यात समाविष्ट असतो. त्याच्या शेपटीचे पंख एकसारखे लालसर असून टोकांकडे गडद होत जातात. तर, मादीच्या शेपटीच्या खालचे आवरण पांढरे असते. तिच्या घशावर पांढरा ठिपका आणि शेपटीवर पांढरा पट्टा असल्याचे दिसून येते. मोनालचा प्रजनन काळ एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान असतो. मादी जमिनीवरच घरटे बनवून, त्यात तीन ते सहा अंडी घालते. महिनाभर उबवताना नर पक्षी त्यांचे रक्षण करतात. मोनालची पिल्ले सहा महिन्यानंतर विहार करण्यास सक्षम बनतात.himalayan monal केवळ नेपाळच नाही, तर हे पक्षी अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भारत, दक्षिण तिबेट आणि भूतानमधील हिमालयापर्यंत पसरले आहेत. प्रचंड थंडीची सवय असणारे हे पक्षी वनस्पतींची मुळे, कंद, काजू, कोवळी पाने, कोंब, कीटक आदी अपृष्ठवंशी शिकार मिळविण्यासाठी बर्फ खणताना दिसतात. खाद्य शोधण्यासाठी ते जमीन २५ सेंमीपर्यंत खणू शकतात. त्यांची नखं आणि चोच मजबूत असून त्याच्या साहाय्याने कीटक, मुळे आणि बिया शोधून त्यावर आपले उदरभरण करतात. मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्यामुळे हिमालयीन मोनल धोक्यात आले आहेत.