काय सांगता...हे दानपेटी व घंट्या चोरत होते ?

22 Dec 2025 21:57:23
हिंगणघाट, 
 
 
hinganghat-thief-temple एक महिन्यापासून मंदिरातील घंटी, दानपेटी तसेच मालवाहू गाडीच्या बॅटर्‍या तसेच पाण्यासाठी वापरण्यात येणारे टिल्लू पंप, काटेरी तार बंडल चोरणार्‍यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी शहरातील २ चोरट्यांसह एका अल्पवयीन बालकास अटक करण्यात आली. एक आठवड्यापूर्वी १४ ते १५ डिसेंबरच्या मध्यरात्री सेंट्रल वार्ड येथील भवानी माता मंदिर येथून मंदिरातील दानपेटी व घंटी चोरी गेल्याबाबतची तक्रार १९ रोजी दाखल करण्यात आली होती.
 
 
 
hinganghat-thief-temple
 
 
 
hinganghat-thief-temple गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार अनिल राऊत, गुन्हे प्रगटीकरण पथक प्रमुख पोहवा प्रविण बावणे यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेतला. मंदिरात चोरी करणारे शेख सकलेन शेख जाकीर(२०) रा. हनुमान वार्ड व मंथन गणेश जुमडे(१९) रा. डांगरी वार्ड तसेच एका बालकास गोपनिय माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. चोरट्यांनी भवानी माता मंदिरातील दानपेटी व घंटी चोरुन नेल्याची कबुली दिली. पोलिसांनी दान पेटी तसेच १ किलो वजनाची ५०० रुपये किंमतीची पितळेची घंटी, दान पेटीतील चोरीस गेलेली ५ हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली.
 
 
 
hinganghat-thief-temple त्यांनी शहरातील वेगवेगळ्या मंदिरातील ३ हजार ५०० रुपये किमतीच्या ७ घंट्या, १ हजार रुपयेचे तार बंडल किंमत, चार चाकी गाड्यांच्या बॅटरी, पाण्याची मोटर व चोरी करण्यात वापरलेले साहित्य असा ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल राऊत, सपोनी संगीता हेलोंडे गुन्हे प्रगटीकरणाचे प्रमुख पोलिस हवालदार प्रवीण बावणे, नरेंद्र आरेकर, निलेशसिंग सुर्यवंशी, संतोष गिते, सागर सांगोले यांनी केली.
Powered By Sangraha 9.0