२ कोटींच्या स्टारने मोडला ४० वर्षांचा विक्रम; यंदा RCB साठी ठरणार 'तुरुप का इक्का'!

22 Dec 2025 14:00:20
नवी दिल्ली,  
jacob-duffy-record आयपीएल २०२६ च्या लिलावात अवघ्या २ कोटी रुपयांत खरेदी करण्यात आलेल्या एका स्टार खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करून दाखवली आहे, जी गेल्या चार दशकांत कोणीही करू शकले नव्हते. या खेळाडूने तब्बल ४० वर्ष जुना विक्रम मोडत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी आयपीएलमध्ये हा खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मैदानात उतरणार असून, संघासाठी तो ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये असून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. काही काळापूर्वी तो अव्वल स्थानावरही होता.

jacob-duffy-record 
 
या खेळाडूविषयी बोलताना भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने आरसीबीच्या निर्णयाचे कौतुक केले. अवघ्या २ कोटी रुपयांच्या बेस प्राइसवर या गोलंदाजाला संघात घेतल्याने आरसीबीने अतिशय शहाणपणाचा निर्णय घेतल्याचे अश्विनने म्हटले. jacob-duffy-record येथे उल्लेख होत आहे तो न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याचा. आयपीएलच्या लिलावात आरसीबीने डफीला केवळ २ कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आणि त्यानंतर डफीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. जेकब डफी आता एका कॅलेंडर वर्षात न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ८० विकेट्स घेतल्या असून, यासह दिग्गज रिचर्ड हॅडली यांचा ४० वर्ष जुना विक्रम मोडला आहे. हॅडली यांनी १९८५ साली ७९ विकेट्स घेतल्या होत्या. याआधी डॅनियल व्हेटोरी यांनी २००८ मध्ये ७६ विकेट्स घेतल्या होत्या, तर ट्रेंट बोल्टने २०१५ मध्ये ७२ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
३१ वर्षीय डफीने बे ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध शानदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने ३५ षटकांत ८६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात २२.३ षटकांत अवघ्या ४२ धावा देत ५ बळी मिळवले. डफीच्या या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना ३२३ धावांनी जिंकला आणि मालिका २-० अशी आपल्या नावावर केली.
Powered By Sangraha 9.0