लाडक्या बहिणींना मकरसंक्रातीपूर्वी मिळणार तीन महिन्याचा लाभ

22 Dec 2025 18:00:25
कारंजा लाड,

Mazi Ladki Bahin Yojana आगामी काळात महानगर पालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. अशा राजकीय वातावरणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना तब्बल तीन हप्त्यांचा म्हणजेच ४५०० रुपयांचा लाभमिळणार असल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे.
 

 Mazi Ladki Bahin Yojana 
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार असून, त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वीच डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा होणार आहे. प्रारंभी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्व अर्जाची सखोल पडताळणी तत्काळ करणे अशक्य ठरले. परिणामी सुरुवातीला कागदपत्रांच्या आधारे लाभ वितरित करण्यात आला. पडताळणीनंतर मात्र अनेक लाभार्थी अपात्र ठरल्या, ज्यामुळे मासिक खर्च कमी झाला आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिला, सरकारी नोकरदार, पुरुष लाभार्थी, चारचाकी वाहनधारक महिला केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या इतर योजनांतील लाभार्थी यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी तसेच नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणार्‍या महिलांना आता दरमहा १५०० ऐवजी ५०० रुपये दिले जात आहेत. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या महत्त्वाची असली, तरी तिची अंमलबजावणी आता अधिक शिस्तबद्ध आणि कडक होताना दिसते. लाभ मिळतोय, पण त्यासोबत छाननीही तितकीच कठोर आहे. त्यामुळे लाडक्या दृष्टीने बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वेळेत ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, मिळणारा नियमित लाभ थांबण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
 

ई-केवायसी साठी उरले ८ दिवस
योजनेचा लाभ सुरू  Mazi Ladki Bahin Yojana ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. सध्या त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली म्हणजेच आता ईकेवायसी साठी केवळ ९ दिवस उरले आहे. असे असले तरी तरी महापालिका व आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमुळे एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की फेब्रुवारीपासून फक्त ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थीनाच लाभमिळेल.
Powered By Sangraha 9.0