नागपूर
Devendra Fadnavis, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. मी अनेकांकडून अभिनंदन स्वीकारतो आहे. त्याचे खरे मानकरी तर माझ्यासमोर बसलेले तुम्ही असंख्य कार्यकर्ते आहात. मी त्याचा वाटेकरी आहे, मात्र या अभूतपूर्व विजय यशाचे खरे वाटेकरी तुम्ही सगळे आहात, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासपूर्वक सांगितले.
नागपूरमधल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या सत्कार प्रसंगी रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.राजीव पोतदार, अरविंद गजभिये, आमदार प्रविण दटके, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार समीर मेघे, टेकचंद सावरकर, आनंदराव राउत, माजी आमदार अशोक मानकर, सुधीर पारवे, राजू पारवे, सुधाकर कोहळे, मनोहर कुंभारे आदी उपस्थित होते.
रामटेक जिल्हा काँग्रेसमुक्त
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाने विक्रम विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहे. रामटेक जिल्हा काँग्रेसमुक्त झाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने एक मोठे जनमत मिळविले आहे. या विजयाने मातणार नाही, माजणार नाही हा आपला संकल्प असला पाहिजे. निवडणुकीतला विजय ही आपल्या कामांची पोचपावती असते. आपण जिंकलेली सगळी शहरे आणि न जिंकलेल्या शहरांमध्ये चांगले विकासाचे काम परिवर्तन घडवून आणणार आहे. या विजयाने आपली सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. एक चांगली सुरुवात झाली असून त्याचे प्रतिबिंब आता महापालिका निवडणुकांच्या निकालांमध्येही दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विकसित नागपूर जिल्ह्याचा संकल्प
विकसित नागपूर जिल्ह्यासाठी मतदान झाले आहे. हेच विकासाचे मॉडेल डोळयासमोर ठेवून केंद्रीय मंत्री नितीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहे. विकसित नागपूर जिल्ह्याचा संकल्प आम्ही केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणूकीत सुध्दा महायुतीचा विजय होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
विजयात असंख्य कार्यकर्त्यांचे श्रेय
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आणण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे. यामागे अनेक कार्यकर्त्यांचे श्रेय आहे. वाडी, डिगडोह देवी, वानाडोंगरी, महादुला, बहादुरा, बेसा पिपळा, गोधनी रेल्वेत नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या प्रचार सभा घेतल्या. महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यात शंभराहून अधिक लहानमोठ्या सभा घेतल्या. संपूर्ण जिल्हा त्यांनी पिंजून काढल्यामुळे हा विजय मिळविता आला, असे स्पष्ट प्रतिपादन डॉ.राजीव पोतदार यांनी केले.