रश्मिका मंदान्नाचा ‘मायसा’मध्ये नवा धमाका

22 Dec 2025 12:47:11
मुंबई,
Mysaa movie सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे एका नवीन अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात, ज्याचे नाव आहे ‘मायसा’. ‘सिकंदर’, ‘थामा’, ‘छावा’, ‘किंगडम’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवलेली रश्मिका, या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या आणि दमदार अवतारात दिसणार आहे.
 

Mysaa movie  
आज, चित्रपट Mysaa movie  निर्मात्यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर ‘मायसा’ चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज केला. पोस्टरमध्ये रश्मिकाचा लूक खूपच प्रभावी आणि जबरदस्त असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण झाली आहे. पोस्टरवर चाहत्यांनी तिच्या लूकची कौतुक करीत भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.चित्रपटाचे निर्माते यांनी पोस्टसोबत लिहिले, “जखमांपासून ताकदीपर्यंत. वेदनेपासून स्वातंत्र्यापर्यंत. जग #MYSAA लक्षात ठेवेल. २४.१२.२५ रोजी पहिला लूक प्रदर्शित होईल. रश्मिकाला कधीही न पाहिलेल्या अवतारात पाहण्यासाठी सज्ज व्हा.” या कॅप्शनमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे.‘मायसा’ हा चित्रपट महिलाभिमुख अ‍ॅक्शन थ्रिलर असून, संपूर्ण भारतातील प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रवींद्र पुले करणार आहेत, तर चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. कॅमेराची जबाबदारी श्रेयस पी. कृष्णा (सूर्याच्या ‘रेट्रो’ मध्ये काम केलेले) सांभाळणार आहेत. तसेच, हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन सीक्वेन्स अँडी लॉंग (कल्की २८९८ एडीमध्ये काम केलेले) यांनी कोरिओग्राफ करणार आहेत.चित्रपटाच्या पोस्टरच्या रिलीजनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. रश्मिकाचा नवीन अवतार पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘मायसा’ चित्रपटाच्या पहिल्या लूकसहच प्रेक्षकांना संपूर्ण अ‍ॅक्शन आणि थ्रिलरचा अनुभव मिळणार असल्याची आशा आहे.
Powered By Sangraha 9.0