इंडिगोचा दिलासा... फ्लाइट रद्द झालेल्या प्रवाशांसाठी व्हाउचर, कोणाला आणि कसे मिळणार?

22 Dec 2025 09:39:57
नवी दिल्ली,
indigo vouchers अलीकडे देशभरात मोठ्या प्रमाणावर इंडिगोच्या उड्डाणे रद्द झाल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइन्सने प्रभावित प्रवाशांसाठी १०,००० रुपयांचे प्रवास व्हाउचर देण्याची घोषणा केली आहे. मात्र, हे व्हाउचर सर्वच प्रवाशांना मिळणार नसून, एअरलाइनकडून अंतर्गत तपासणीनंतर निवडक प्रवाशांनाच दिले जाणार आहेत.
 
indigo flight 
 
 
 
कोण पात्र प्रवासी असतील?
इंडिगोने स्पष्ट केले आहे की ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर दुपारपर्यंत फ्लाइट रद्दीकरणामुळे ज्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली, अशा प्रवाशांचा आढावा घेतला जाईल. या कालावधीत रद्द झालेल्या फ्लाइटवरील सर्व प्रवाशांना व्हाउचर मिळेलच असे नाही, तर एअरलाइनकडून पात्रतेनुसार निर्णय घेतला जाईल.
व्हाउचर कधी आणि कसे मिळेल?
एअरलाइनच्या माहितीनुसार, पात्र प्रवाशांना २६ डिसेंबरपासून व्हाउचर देण्याची प्रक्रिया सुरू होईल. ज्या प्रवाशांचे संपर्क तपशील इंडिगोकडे उपलब्ध आहेत, त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यात येईल. जर तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे बुक केले असेल, तर संबंधित ट्रॅव्हल पार्टनरकडून माहिती घेऊन प्रवाशांशी संपर्क केला जाईल. बुकिंग तपशीलाची पडताळणी झाल्यानंतर १०,००० रुपयांचे व्हाउचर जारी करण्यात येईल.
व्हाउचर न मिळाल्यास काय कराल?
जर एखाद्या पात्र प्रवाशाला व्हाउचर मिळाले नाही, तर १ जानेवारीपासून इंडिगो एक स्वतंत्र वेबपेज सुरू करणार आहे. त्या ठिकाणी प्रवासी आपले प्रवास तपशील भरून व्हाउचरचा दावा करू शकतील.
व्हाउचरचा वापर कसा करायचा?
हे १०,००० रुपयांचे व्हाउचर इंडिगोच्या भविष्यातील कोणत्याही प्रवासासाठी वापरता येईल.indigo vouchers व्हाउचर जारी झाल्याच्या तारखेपासून पुढील १२ महिन्यांच्या आत ते वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0