रोहितने बेन स्टोक्सच्या संघाला केले ट्रोल; म्हणाला, "तुम्ही इंग्लंडला विचारू शकता..."

22 Dec 2025 19:02:39
नवी दिल्ली,  
rohit-trolled-ben-stokes-team रोहित शर्मा किती विनोदी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अलिकडेच, "हिटमॅन" ने इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सवर टीका केली. सध्या सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर, २१ डिसेंबर रोजी गुरुग्राममध्ये झालेल्या एका कार्यक्रमात रोहितने ऑस्ट्रेलियातील क्रिकेट किती कठीण असते याबाबत भाष्य केले. तो हसत म्हणाला, “ऑस्ट्रेलियात खेळणं सोपं नाही, याबाबत तुम्ही इंग्लंडलाच विचारू शकता.”
 
rohit-trolled-ben-stokes-team
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील कसोटी मालिकेत पाच डावांत केवळ ३१ धावा करणाऱ्या रोहितने त्याच संघाविरुद्धच्या वनडे मालिकेत मात्र शानदार पुनरागमन करत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. यावेळी त्याने स्पष्ट केले की तो वनडे क्रिकेट खेळत राहण्याचा निर्धार केलेला आहे आणि २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी तो पूर्णपणे कटिबद्ध आहे. आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, सुरुवात त्याच्यासाठीही खूप अवघड होती. पण एकदा गती मिळाल्यानंतर प्रवास वेगाने सुरू झाला. rohit-trolled-ben-stokes-team त्याने जीवनाची तुलना विमानप्रवासाशी करत सांगितले की, एकदा विमान उंची गाठल्यावर ते लगेच खाली येत नाही. “मला वाटतं, हाच खरा अर्थ आहे. मला हे विमान इतक्या लवकर उतरवायचं नाही, अजून काही काळ मला वरच राहायचं आहे,” असे तो म्हणाला.
सौजन्य : सोशल मीडिया 
तो पुढे म्हणाला की, जेव्हा विमान ३५ ते ४० हजार फूट उंचीवर पोहोचते, तेव्हा प्रवास आरामदायी वाटतो. rohit-trolled-ben-stokes-team आपण खाऊ शकतो, झोपू शकतो, तसंच आयुष्यातही एकदा योग्य गती मिळाल्यावर ती टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं. उतरणं आवश्यक असतं, पण ते कधी करायचं, हे आपल्या हातात असतं, असेही रोहितने सांगितले.आगामी काळात रोहित शर्मा मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये खेळताना दिसणार आहे. तसेच ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही तो मैदानात उतरणार आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहितने आतापर्यंत सहा वनडे सामने खेळले असून त्यात एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. घरगुती स्पर्धा आणि किवी संघाविरुद्धच्या मालिकेतही तो हीच दमदार फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे.
Powered By Sangraha 9.0