समुद्रपूर,
wardha-anganwadi-school तालुक्यातील मोहगाव येथील अंगणवाडीची इमारत जीर्ण झाल्याने याठिकाणी नवीन अंगणवाडी इमारत मंजूर करण्यात आली. मे महिन्यात या अंगणवाडीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने चिमुकल्यांना ग्रामपंचायत कार्यालयातच शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. मात्र, नवीन इमारत मंजूर झाल्यानंतर सात महिने लोटूनही अद्याप काम सुरू झाले नसल्याने आपल्या हक्काच्या शाळेपासून हे छोटे विद्यार्थी वंचित आहेत.
wardha-anganwadi-school मोहगाव येथे जुनी अंगणवाडी इमारत होती. या अंगणवाडीतूनच विद्यार्थी शिक्षण व संस्काराचे धडे गिरवित होते. मात्र, इमारत पूर्णत: जीर्ण झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात छतातून पाणी गळू लागले. दरम्यान, ७ मे रोजी अंगणवाडीच्या छताचे प्लास्टर कोसळले. सुदैवाने यावेळी चिमुकल्यांना सुटी झाल्याने थोडयात जीवितहानी टळली. यावेळी इमारतीत ठेवून असलेला पंखा व इतर साहित्यांचे नुकसान झाले. याबाबत सरपंच विलास नवघरे यांनी आ. समीर कुणावार यांना माहिती देऊन नवीन इमारत मंजूर करण्याची मागणी केली होती. आ. कुणावार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषद बांधकाम विभाग व बालकल्याण विभागाला पत्र देऊन याठिकाणी नवीन अंगणवाडी मंजूर करून दिली. मात्र, सात महिने लोटूनही ईमारतीची निविदा प्रक्रिया व काम चालू झाले नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयातच अंगणवाडी भरवली जात आहे.
wardha-anganwadi-school सरपंच विलास नवघरे यांनी अंगणवाडी इमारत धोकादायक व जिर्ण असल्याने याठिकाणी केव्हाही मोठी दुर्घटनेची शयता लक्षात घेऊन नवीन इमारत होईपर्यंत तात्पुरते ग्रामपंचायत कार्यालयात वर्ग भरवण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका छाया ओरके यांना दिल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातच वर्ग सुरू आहे. मागील २ वर्षापासून सरपंच विलास नवघरे यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून मोहगाव येथे नवीन अंगणवाडी इमारत देण्याची मागणी केली होती. ३० ऑगस्ट २०२४ रोजी मोहगाव व तावी येथील अंगणवाडीच्या जागेची जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने पाहणी करून संबंधित जागेचे फोटो काढून प्रस्ताव तयार केला. मात्र, अनेक महिन्यांचा कालावधी लोटला असून मोहगाव व तावी या दोन्ही अंगणवाडीची अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. संबंधित विभागाने चिमुकल्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन तातडीने मंजूर नवीन इमारतीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून इमारतीचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी केली आहे.