...अन् वाघिण पोलिसांना आडवी !

22 Dec 2025 21:36:45
वर्धा, 
 
wardha-tiger-ashti आष्टीचे ठाणेदार राजेश जोशी आपल्या सहकार्‍यांसह आष्टी-थार मार्गाने जात असताना त्यांना पट्टेदार वाघिणीसह तिच्या तीन छाव्यांचे रस्ता ओलांडताना दर्शन झाले. त्यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिल्यावर वनविभागाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला.
 
 

wardha-tiger-ashti 
 
 
wardha-tiger-ashti आष्टीचे ठाणेदार राजेश जोशी व त्यांचे सहकारी कार्यालयीन कामासाठी आष्टी-थार मार्गाने जात होते. वाहन जंगल परिसरात आले असता प्रथम डरकाळी देत वाघीण रस्त्यावर आली. सुमारे ५ ते ७ मिनीट तिने रस्त्यावरच डरकाळी फोडल्यावर तिचे तीन छावेही रस्त्यावर आले. वाघीण आणि तिच्या तिन्ही छावे रस्ता ओलांडत जंगलात निघून गेले. एकूणच ठाणेदारांचा मार्ग वाघिणीने सुमारे अर्धा तास रोखून धरला होता. वाघीण व तिघे छावे जंगलात निघून गेल्यावर ठाणेदारांनी पुढील प्रवास करीत नियोजित ठिकाण गाठले.
wardha-tiger-ashti पिपरी (मेघे), येळाकेळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुतसंचार होत आहे. काहींना पिपरी मेघे भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येळाकेळी व पिपरी मेघे येथील नागरिकांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0