प्रियकरासोबत दिसली पत्नी; पतीने रंगेहाथ पकडून रस्त्यावर झोडपले, VIDEO

22 Dec 2025 17:41:11
नवी दिल्ली,  
extra-marital-affairs-viral-video सायंकाळच्या वेळी एक महिला आपल्या कथित प्रियकरासोबत फिरायला बाहेर पडली होती. मात्र अचानक तिचा पती तेथे पोहोचला आणि त्याने दोघांनाही रस्त्यावर रंगेहात पकडले. यानंतर भररस्त्यात जोरदार वाद आणि हातापाई झाली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा प्रकार नेमका कुठे आणि कधी घडला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

extra-marital-affairs-viral-video 
 
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण आणि एक तरुणी रस्त्यावर चालताना दिसत आहेत. तेवढ्यात एक अन्य तरुण तिथे येतो. तरुणीला पाहताच तो संतापून आरडाओरडा करू लागतो. रागाच्या भरात तो तरुणीला ढकलतो, ती खाली पडते आणि तो तिच्यावर हात उगारतो. मात्र तरुणीही गप्प बसत नाही. ती लगेच उठून त्याला प्रतिउत्तर देते आणि दोघांमध्ये तीव्र शाब्दिक वाद सुरू होतो. या सगळ्या गोंधळात तिच्यासोबत असलेला दुसरा तरुण बाजूला उभा राहून सगळं पाहत राहतो. extra-marital-affairs-viral-video रस्त्यावर गोंधळ वाढताच आजूबाजूला लोकांची गर्दी जमते. व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगाही तिथे उपस्थित असल्याचे दिसते. काही वेळानंतर तो तरुण स्कूटीवर बसून तिथून निघून जातो, मात्र जातानाही तो सतत ओरडताना दिसतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओतील महिला आणि संतप्त तरुण हे पती-पत्नी असून महिलाचे विवाहबाह्य संबंध होते, असा दावा केला जात आहे. ती आपल्या प्रियकरासोबत बाहेर असताना पतीने तिला रंगेहात पकडल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडिओ ‘घर का कलेश’ नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सोशल मीडिया उघडताच सतत अशाच विवाहबाह्य संबंधांच्या घटना पाहायला मिळतात, जे अत्यंत घृणास्पद आहे.
Powered By Sangraha 9.0