नागपूर,
Atmasparsh Charitable Trust ताई सुकळीकर यांच्या जन्मदिनानिमित्त आत्मस्पर्श चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. अभिरुची पळसापुरे यांच्या हस्ते दीनदयाल शोध संस्थान, बालजगत येथील तलाव शुद्धीकरणासाठी ४,००० कार्प (Carp Fish) जातीचे मासे भेट देण्यात आले.
बालजगत परिसरातील तलावाची स्वच्छता व पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी या मास्यांचा उपयोग करण्यात येणार आहे. हे मासे विशेषतः कलकत्ता येथून मागविण्यात आले.Atmasparsh Charitable Trust तलावातील जैविक समतोल राखण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत.पर्यावरण रक्षण व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आत्मस्पर्श चॅरिटेबल ट्रस्टने राबविलेला हा उपक्रम उल्लेखनीय असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
सौजन्य :निकिता लुटे ,संपर्क मित्र