ढाका,
Dhaka cell of ISI by Munir बांगलादेशमधील सध्या सुरू असलेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानच्या लष्कराचा गुप्त हात असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ढाकामध्ये गुप्त आयएसआय सेल तयार केले असून, त्याचे नेतृत्व एका पाकिस्तानी ब्रिगेडियरकडे आहे. या ब्रिगेडियरसोबत मेजरसह अनेक पाकिस्तानी अधिकारी या स्पेशल विंगमध्ये काम करतात. ढाका सेलचे मुख्य उद्दिष्ट बांगलादेशमध्ये कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामीला सत्ता मिळवून देणे आहे. यासाठी सेलने देशातील वातावरण जास्तीत जास्त अस्थिर करण्याचे प्रयत्न केले असून, बांगलादेशी मीडिया हाऊसेसवर झालेल्या हल्ल्यांमध्ये त्याची थेट भूमिका आहे. सेल दरमहा २०० दशलक्ष टका खर्च करतो, हे पैसे भारतातील ड्रग्ज तस्करी आणि बनावट चलन व्यापारातून मिळवले जातात.

या हिंसाचारात प्रमुख विद्यार्थी नेते आणि इन्किलाब मंचाचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली, तर ईशनिंदेच्या आरोपाखाली एका हिंदू नागरिक दिपू चंद्र दास यांना मारहाण करून मृतदेह जाळण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला असून, नागरिकांना हिंसाचार, चिथावणी आणि द्वेष नाकारून हादीच्या स्मरणाचे आवाहन केले आहे. देशात सुरू असलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तणाव वाढला असून, सरकार आणि सुरक्षा यंत्रणा ढाका सेलच्या गुप्त हल्ल्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.