वीज चोरी प्रकरणी नेहारे बंधूंवर गुन्हा दाखल

23 Dec 2025 19:05:07
वर्धा, 
electricity-theft-case : थेट तारांवर आकडा टाकून मीटरशिवाय घरी वीज पुरवठा घेणार्‍या पिपरी (मेघे) येथील नेहारे बंधूंवर शहर पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई २२ रोजी सहाय्यक अभियंता प्रवीण डोंगरे यांनी केली. उपविभाग वर्धा ग्रामीण अंतर्गत येणार्‍या पिपरी कक्ष येथे सहाय्यक अभियंता म्हणून प्रवीण डोंगरे हे कार्यरत आहेत. १३ जून २०२५ रोजी डोंगरे हे सहकार्‍यांसोबत पिपरी मेघे येथील नरेश नेहारे यांच्या घरी पाहणी करीत असताना महावितरणच्या तारांवर वायर टाकून निखील नेहारे व त्यांचे बंधू भारत नेहारे यांनी वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले.
 
 
संग्रहित फोटो
 
त्यांच्या घरी कुठलेही मीटर नसताना चोरीची वीज वापरत असल्याचे आढळून आले. पथकाने काळ्या रंगाची ३० फूट वायर जप्त करून निखील व भारत नेहारे यांची चौकशी केली. यादरम्यान त्यांनी वर्षभरापासून ३६ हजार ५४० रुपयांची १८७७ युनिटची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. २ हजार रुपये दंड आकारण्यात आला. त्यांनी आजपर्यंत तडजोडीची रकम व वीज चोरीचे दंडात्मक देयक न भरल्यामुळे सहाय्यक अभियंता डोंगरे यांनी २२ रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Powered By Sangraha 9.0