सोलापूर,
farmer-kidney-selling-case महाराष्ट्रात कर्जबाजारी शेतकऱ्यांची किडनी विक्री प्रकरण धक्कादायक उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांच्या विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले असून पीडित रोशन कुडेला कंबोडियात किडनी विक्रीस प्रवृत्त करणारा एजंट ‘डॉ. कृष्णा’ उर्फ मल्लेश याला सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. तपासात समोर आले आहे की, ‘डॉ. कृष्णा’ हे बनावट नाव असून प्रत्यक्ष नाव मल्लेश आहे. तो मूळ सोलापूरचा रहिवासी असून, व्यवसायाने अभियंता असून स्वतःचीही किडनी विकलेली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी फेसबुकवरील ‘किडनी डोनर कम्युनिटी’ पेजच्या माध्यमातून डॉ. कृष्णा याच्याशी संपर्क साधला. चेन्नई येथील डॉक्टर असल्याचे सांगून त्याने कुडेला फसवले. नंतर दोघे व्हॉट्सऍप चॅटच्या माध्यमातून संपर्कात राहिले. farmer-kidney-selling-case आठ लाख रुपयांत किडनी विकण्याचा निर्णय घेऊन कुडेने कोलकता विमानतळावर डॉ. कृष्णा याची भेट घेतली आणि नंतर किडनी विक्रीसाठी कंबोडियात पोहोचला. सहा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आणि मानवी अवयव तस्करीच्या तपासासाठी विशेष पथक गठित करण्यात आले. सात दिवस लोटूनही कोणताही सुगावा लागलेला नव्हता. मात्र, २२ डिसेंबरला डॉ. कृष्णाला सोलापूरमधून रात्री उशिरा अटक करण्यात आली. तपासात समोर आले की, डॉ. कृष्णा आर्थिक विवंचनेत होता, त्याने कापडाचा व्यवसाय केला होता, पण तो बुडाला आणि स्वतःची किडनी विकली.
यानंतर तो किडनी विक्रीच्या रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करू लागला. रोशन कुडे यासह आणखी किती जणांना त्याने जाळ्यात अडकवले, याचा तपास सुरु आहे. राजस्थान, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि बांग्लादेशातील पीडितांनी किडनी विकल्याचे आधीच समोर आले होते. डॉ. कृष्णाला अटक झाल्याने संपूर्ण देशभरातील किडनी विक्रीचे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. तपासात समोर आले की, रोशन कुडे हा डॉ. कृष्णा नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सऍपद्वारे संपर्कात होता. पोलिसांनी क्रमांकाचे लोकेशन ट्रेस केले असता, तो सोलापूरमध्ये असल्याचे समोर आले. farmer-kidney-selling-case यानुसार, डॉ. कृष्णाला सोलापूरहून ताब्यात घेण्यात आले. ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर केले.