अनिल कांबळे
नागपूर,
female police officer raped एका विवाहित तरुणाने महिला पाेलिस कर्मचाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लाॅजवर नेऊन बलात्कार केला. तसेच शारीरिक संबंधाचे माेबाईलने फोटाे आणि व्हिडिओ काढून 15 लाख 60 हजार रुपयांनी लुबाडून फसवणूक केली. या प्रकरणी लकडगंज पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी तपास सुरू केला आहे. आराेपीचे नाव विकीन सूर्यभान फुलारे (वय 30, रा. गंगापूर, छत्रपती संभाजीनगर) असे आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता 25 वर्षीय महिला पाेलिस अंमलदार राेमा (काल्पनिक नाव) असून तिने लग्नासाठी एका विवाह नाेंदणी संकेतस्थळावर नाेंदणी केली हाेती. याच दरम्यान आराेपी विकीन फुलारे याने तिला संपर्क केला. अविवाहित असून व्यवसायाने वकील असल्याचे सांगितले. विश्वास संपादन केल्यानंतर ताे तिच्याशी चॅटिंग करीत हाेता. त्याने व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून तिला श्रीमंत असल्याचे भासवले. त्यामुळे ती महिला पाेलिस त्याच्यावर भाळली. गेल्या चार महिन्यांपासून एकमेकांशी संपर्कात असल्यामुळे त्याने राेमाला भेटायची इच्छा व्यक्त केली. ताे गेल्या 28 नाेव्हेंबरला नागपुरात आला. राेमाने त्याला पाेलिस वसाहतीत असलेल्या घरी नेले. त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राेमाला लाॅजवर नेऊन तिचे शारीरिक संबंधाचे फोटाे आणि व्हिडिओ काढले.
वेळाेवेळी मागितले पैसे
आराेपी विकीनने फर्निचर खरेदी, वैयक्तिक अडचणी व इतर गरजांचे कारण सांगून राेमाकडून वेळाेवेळी पैसे उकळले. पुढे वेगवेगळी कारणे देत त्याने सातत्याने अधिक पैशांची मागणी केली. 15.60 लाख रुपये उकळल्यानंतरही आराेपीच्या मागण्या थांबल्या नाहीत. आराेपीने राेमाला कुुटंबियांशी ओळख करुन देण्याच्या बहाण्याने छत्रपती संभाजीनगर येथे नेले. तेथे एका हाॅटेलमध्ये पुन्हा शारीरिक संबंध ठेवले आणि बळजबरी तिचे व्हिडिओ काढले.
तरुण निघाला विवाहित
आराेपी आधीच विवाहित असून त्याला दाेन मुले असल्याची माहिती राेमाला कळली. याबाबत जाब विचारल्यावर आराेपीने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिचे फोटाे व व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल करण्याची, तसेच किन्नरांच्या मदतीने तिच्या कुटुंबीयांची हत्या घडवून आणण्याची धमकी दिली.female police officer raped या धमक्यांमुळे मानसिक त्रास सहन करत अखेर महिला पाेलिस शिपायाने लकडगंज पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी आराेपीविराेधात फसवणूक, लैंगिक शाेषण, धमकी व ब्लॅकमेलिंगसह विविध कलमांखाली गुन्हा नाेंदवला असून प्रकरणाचा सखाेल तपास सुरू आहे.