कारंजा लाड,
sandeep-sonone : शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली कारंजा लाड येथील शाळा शोभनाताई नरेंद्रकुमार चवरे विद्यालयाचे शिक्षक तथा पर्यवेक्षक संदीप उर्फ पंकज सोनोने यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. पुणे येथील एस. एन. एल. सामाजिक सेवाभावी संस्था फाउंडेशन यांच्यावतीने संदीप उर्फ पंकज पंजाबराव सोनोने यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला.

सदर पुरस्कार पुणे चिंचवड येथील एलप्रो सिटी प्रेक्षागृह येथे सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर पुरस्कार जगप्रसिद्ध येवले अमृततुल्य चे सीईओ नवनाथ येवले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्याला राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, आशिष दामले राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मोहम्मद हाजी मोमीन भाईजान, निलेश साबे यांच्या उपस्थितीत हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. यासाठी सर्वस्तरातून तसेच शाळेचे अध्यक्ष शशिकांत चवरे, उपाध्यक्षा शुभदा चवरे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी संदीप उर्फ पंकज सोनोने यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच संदीप उर्फ पंकज सोनोने हे शिक्षका सोबतच पत्रकारिता व सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहे.