मंगरूळनाथ,
murder-case : महागाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील स्वतःच्या जागेत मुरूम पसरविण्यावरून झालेल्या वादात चुलत भावाला ठार तर काकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेप व प्रत्येकी २०००० रुपये इतकी द्रव्य दंड शिक्षा सुनावली आहे.

मनकर्णाबाई बाबूलाल ठोकळ तिचे पति बाबुलाल ठोकळ मुलगा गजानन बाबूलाल ठोकळ, दुसरा मुलगा कृष्णा बाबुलाल ठोकळ हे त्यांनी विकत घेतलेल्या महागाव ता. कारंजा लाड, जि. वाशीम येथील जागेत ५ जून रोजी मुरुम पसरवत असतांना आरोपींनी फिर्यादी व त्याचे कुटुंबासोबत मुरुम पसरवण्याचे कामावरुन वाद घातला व आरोपी प्रफुल योच जागेत मुरुम का पसरवला या कारणावरुन आरोपी प्रफुल ठोकळ याने गजानन बाबुलाल ठोकळ याला जिवानीशी ठार मारले व बाबुलाल ठोकळ याला डोयात गज मारुन गंभीर जखमी केले तेव्हा आरोपी प्रफुलचे आई वडील पंडीत ठोकळ व कामीना ठोकळ यांनी सुध्दा लोखंडी गजाने गजानन याला मारहाण केली. असा रिपोर्ट मनकर्णा बाबुलाल ठोकळ यांनी आरोपी पुतण्या प्रफुल ठोकळ भासरे पंडीत ठोकळ व जाऊ कामिनी ठोकळ यांचे विरुध्द पो. स्टे. कारंजा ग्रामिण येथे रिपोर्ट देउन अपराध क्र. २३९/२०२० आरोपी विरुध्द कलम ३०२, ३०७, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होउन तपास अधिकारी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करुन सदर गुन्हा सत्र न्यायालय मंगरुळनाथ येथे खटला क्र. २५/२०२० हा दाखल झाला होता.
त्यामध्ये सरकार पक्षाने आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द करण्याकरीता एकूण १६ साक्षिदार तपासले त्यामध्ये आरोपी विरुध्द कलम ३०२, ३०७ प्रमाणे गुन्हा सिध्द झाला आहे व मंगरुळनाथ येथील सत्र न्यायाधिश वैभव व्ही पाटील यांनी २३ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी प्रफुल ठोकळ, पंडीत ठोकळ व कामीनी ठोकळ यांना कलम ३०२ प्रमाणे दोषी ठरवून जन्म ठेपेची शिक्षा दिली आहे व प्रत्येकी २०,०००/-रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा तसेच आरोपी प्रफुल याला कलम ३०७ नुसार १० वर्षाची शिक्षा व १०,०००/- रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून पुरुषोत्तम एस. ढोबळे यांनी काम पाहीले व कोर्ट पैरवी म्हणून संदीप नप्ते यांनी काम पाहीले.