न्यू साउथ वेल्स,
New South Wales gun laws बोंडी बीचवरील दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले न्यू साउथ वेल्स राज्य कडक बंदूक कायदे लागू करण्याची तयारी करत आहे. या कायद्यांत दहशतवादी प्रतीकांचे प्रदर्शन, हिंसक निदर्शने आणि अनधिकृत बंदुकीच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. सोमवारी रात्री झालेल्या आपत्कालीन सत्रात राज्य संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने ‘दहशतवाद आणि इतर कायदे दुरुस्ती’ विधेयक मंजूर केले. या विधेयकाला न्यू साउथ वेल्समधील विरोधी लिबरल पक्षाचा पाठिंबा आहे. मंगळवारी वरिष्ठ सभागृहातही हे विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा आहे.

सत्ताधारी कामगार सरकारने वैयक्तिक बंदूक परवान्यांसाठी चार बंदुकींपर्यंत मर्यादित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, तर शेतकऱ्यांसाठी थोडी सूट देऊन १० बंदूकांपर्यंत परवानगी राहणार आहे. हे बदल सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादी हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी आहेत. १४ डिसेंबर रोजी बोंडी येथे ज्यू हनुक्का उत्सवादरम्यान झालेल्या सामूहिक गोळीबारात पंधरा जण ठार झाले आणि अनेक जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोर साजिद अक्रम याला गोळ्या घालून ठार केले, त्याच्याकडे सहा शस्त्रे आढळली. अक्रमकडे आणि त्याच्या २४ वर्षीय मुलाला खून, दहशतवादासह एकूण ५९ गुन्हे होते.
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या सर्वेक्षणानुसार, ऑस्ट्रेलियातील जवळजवळ तीन-चतुर्थांश लोक कडक बंदूक कायद्यांना पाठिंबा देतात. मात्र ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणाऱ्या नॅशनल्स पार्टीने शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये, म्हणून या सुधारणांचा विरोध केला आहे. न्यू साउथ वेल्स सरकारचे हे पाऊल दहशतवाद प्रतिबंध आणि बंदूक हिंसाचार रोखण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे मानले जात आहे.