नागपूर,
solar energy रेल्वे, नागपूर विभागांतर्गत लेव्हल क्रॉसिंग गेट्सवर ऑल-इन-वन सोलर स्ट्रीट लाइट्स आणि ऑफ-ग्रीड सोलर सिस्टम्स बसवण्यात आले आहेत. जेथे अत्याधुनिक वीज पुरवठा किंवा एटी पुरवठा उपलब्ध नाही, तेथे प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे आणि पर्यावरण संरक्षणाला संरक्षणाला चालना देणे, हा या बदलाचा उद्देश
या योजनेअंतर्गत, चार एलसी गेट्सवर मोशन सुसज्ज आधुनिक सोलर स्ट्रीट लाइट्स बसवण्यात आले आहेत. हे आवश्यकतेनुसार प्रकाशाची तीव्रता आपोआप समायोजित करतात. उल्लेखनीय म्हणजे, हे दिवे सलग दोन दिवस सूर्यप्रकाश नसतानाही रात्रभर कार्यरत राहतात. याव्यतिरिक्त, प्रत्येक एलसी गेट केबिनच्या छतावर ७५ वॅटची ऑफ-ग्रीड सोलर सिस्टम बसवण्यात आली आहे,solar energy जी दिवे, आणि प्लग पॉइंट्सना वीज पुरवते.