सल्फर बेलीड वार्बलर

23 Dec 2025 16:33:02
sulphur bellied warbler पक्षी हा बराच वेळपर्यंत एकाच जागी शांत बसलेला आपण कधी पाहिला आहे का? शक्यच नाही! कोणताही पक्षी एका जागी स्थितप्रज्ञावस्थेत बसूच शकत नाही. तो चंचल आहे. बहुतेकदा झाडाच्या खोडांवर, भिंतीवर किंवा खडकांवर पक्ष्यांना रेंगाळतानाच आपण पाहतो किंवा जुन्या इमारतींच्या आजूबाजूच्या खडकाळ भागात राहून तेथेच विहार करायला पक्ष्यांना अधिक आवडते. अशा एका गाणाऱ्या पक्ष्याची ओळख आज आपण करून घेऊ.
 
 
 
सल्फर बेलीड वार्बलर
 
त्याचे नाव आहे सल्फर बेलीड वार्बलर अर्थात फिलोस्कोपस ग्रिसेओलसः सल्फर-बेलीड वार्बलर नामक हा पक्षी अतिशय चंचल असून कुणाच्या फारसे लक्षात येऊ नये म्हणून, चोरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरताना आढळतो. सल्फर बेलीड वॉर्बलर या गाणाऱ्या पक्ष्याला जुन्या इमारतींभोवती खडकाळ भागात राहायला आवडते. त्याचमुळे पक्षिमित्रांना या पक्ष्याला आपल्या कॅमन्ऱ्यात कैद करण्याची आवड निर्माण झाल्याखेरीज राहात नाही. फक्त त्यासाठी संयम अतिशय गरजेचा आहे. त्याच्या तीक्ष्ण अशा वैशिष्ट्यपूर्ण आवाजाच्या अंदाजानेच आपला कॅमेरा धरून त्याला चित्रबद्ध करता येऊ शकते. सल्फर बेलीड वार्बलर या पक्ष्यांमधील नर आणि मादी दिसायला सारखे जरी असले, तरी त्या दोघांचा आकार ११ सेंटीमीटर एवढाच असतो. वरचा 'भाग तपकिरी, डोळ्यावर पट्टे, पुढचा भाग नारंगी-पिवळा असलेले सुपरसिलियम, पंखांचे पट्टे नसलेले आणि खालचा भाग तपकिरी पिवळा अशी त्याच्या शरीराची ठेवण असून, झाडांच्यालहान फांद्या आणि पानांमधून कीटक गोळा करण्याचे कसब त्यांच्यात असते. खडकाळ टेकड्या आणि झाडी जंगलातील अधिवासात सल्फर बेलीड वार्बलर प्रामुख्याने आढळतात. लीफ वॉर्बलरची सल्फर बेलीड वॉर्बलर ही एक प्रजाती असून अफगाणिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, मंगोलिया आदी ठिकाणी आपला घरठाव करतात.sulphur bellied warbler ही प्रजाती लहान गटात आढळते. विहार करताना सतत गातच राहणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. सल्फर बेलीड वार्बलर आपल्या गायनाचा उपयोग इतर पक्ष्यांना हुसकावून लावण्यासाठी करीत असावा सल्फर बेलीड वार्बलरची चोच पातळ असून त्याच्या पोटाचा रंग पिवळा असल्याचे आढळून आले आहे.
Powered By Sangraha 9.0